मित्र

 

मयूरी देशमुख

तुझा मित्र.. चिराग  मेहता

त्याच्यातली सकारात्मक गोष्ट…खूप सकारात्मक आहे. लोकांना मदत करतो. त्यासाठी कोणतंही कौतुक किंवा प्रसिद्धीची अपेक्षा करत नाही.

 त्याच्यातली खटकणारी गोष्ट…खूप गोड खातो. काही बाबतीत उगाच राग मनात धरून ठेवतो.

त्याच्याकडून मिळालेली आतापर्यंतची सुंदर भेट..स्टिव्ह जॉबच्या बायोग्राफीचं त्याने मला दिलेलं पुस्तक.

 त्याच्याकडून काय शिकलीस?…फार विचार न करता हसत खेळत जगलं पाहिजे, दुसऱयांना मदत करायला हवी, हे शिकले.

 त्याचा आवडता पदार्थ..सगळे चॉकलेट्स आणि डेझर्ट.

 तो निराश असतो तेव्हा..त्याला एकांत हवा असतो.

 एकमेकांना वेळ देता का..त्याचा आणि त्याच्या बायकोचा मला भेटण्याचा प्रयत्न असतो, पण हल्ली शूटिंगमुळे वेळ नसतो.

दोघांचे भेटण्याचे ठिकाण.. सतत बदलतात. माझ्या घरी आम्ही भेटतो.

 त्याच्या सोबतचा अविस्मरणीय क्षण.. माझ्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तो नाशिकला आला आणि मला सरप्राईझ दिलं.

तू चुकतेस तेव्हा तो काय करतो..मला समजावतो.

भांडण झाल्यावर काय करता?..खूप भांडतो, मात्र त्यावेळी त्याला समजावणं कठीण असतं. त्याचा राग शांत झाल्यावरच ते शक्य होतं.

दोघांपैकी जास्त राग कोणाला येतो?…त्याला.

त्याचं वर्णन..त्याला आयुष्य छान जगायला आवडतं. कुटुंब जपणं आणि कुटुंबाला घेऊन पुढे जाणं हे त्याला माहीत आहे. फिटनेसचीही काळजी घेतो. मित्रांना वेळात वेळ काढून भेटतो.

तुझी एखादी त्याला आवडणारी सवय..मी खूप विचार करते हे त्याला आवडत नाही.