ब्रॅण्डेड सखी

51

कुशल बद्रिके

तुझी मैत्रीण? – श्रेया बुगडे

तिच्यातली सकारात्मक गोष्ट? –  ती खूप सकारात्मक विचार करते.

तिच्यातली खटकणारी गोष्ट? – तिला ब्रॅण्डेड वस्तू आवडतात. सतत अधिकाधिक ब्रॅण्डेड वस्तूंच्या ती शोधात असते.

तिच्याकडून मिळालेली आतापर्यंतची सुंदर भेट? – तिला माझी मनी पर्स आवडत नाही. कारण ती ब्रॅण्डेड नाही. ती मला नवीन ब्रॅण्डेड मनी पर्स देणार आहे.

तुमची सुटीविषयीची कल्पना? – रंग मला आकर्षित करतात. त्यामुळे चित्रं रंगवणं, काढणं अशा गोष्टी करायला सुट्टीत प्राधान्य देतो.

सुट्टी कशी घालवता? – आम्ही दोघेही आमची सुट्टी आमच्या कुटुंबीयांना वेळ देण्यात घालवतो. कारण आम्हाला कामामुळे त्यांच्यासाठी वेळ देता येत नाही.

सुट्टीत कुठे जायला आवडेल? – शहरी आयुष्यापेक्षा वेगळ्या जागी जायला आवडेल. जंगल सफारीला जायला आवडतं.

काय खायला प्राधान्य द्याल? – कधीही, कुठेही पाणीपुरी.

तिच्याकडून काय शिकलात? – सतत उत्साही राहणं, स्वतःला खूप छान पद्धतीने प्रेझेंट कसं करायचं, हे मी तिच्याकडून शिकलो.

तिचा आवडता पदार्थ? – मासे

ती निराश असते तेव्हा? – ती निराश झालेली कधी पाहिली नाही.

 एकमेकांसाठी वेळ देता का? – कामाव्यतिरिक्त आम्ही एकमेकांना वेळ देत नाही. आठवडय़ातून ३-४ दिवस आम्ही कामानिमित्त एकत्रच असतो.

दोघांचे भेटण्याचे ठिकाण क्लासिक स्टुडियो, मीरा रोड.

 तिच्यासोबतचा अविस्मरणीय क्षण? – विनोदी भूमिका तिला जमत नाहीत, असं वाटायचं, पण तिने लोकांची मने जिंकली. त्यासाठी श्रेयाने घेतलेली मेहनत हाच माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे.

 तू चुकतोस तेव्हा ती काय करते? – मला खूप बोलते. जोपर्यंत मी तिला आता गप्प बैस असं सांगत नाही, तोपर्यंत ती बोलतच राहते.

भांडण झाल्यावर काय करता? – भांडणं खूप होतात, पण आम्ही लगेच  शांत होतो. माझी चूक असेल तर मी विनोद करतो आणि तिची चूक असेल तर ती विनोद करते.

दोघांपैकी जास्त राग कोणाला येतो? – दोघांनाही नाही.

 तिचं वर्णन? – ती स्वतःची खूप काळजी घेते. एखाद्या फुलदाणीमध्ये जशी वेगवेगळ्या रंगांची फुले असतात तसे तिच्यामध्ये गुणांचे रंग आहेत.

 तुझी तिला आवडणारी सवय? – मला असं वाटत नाही की, तिला माझी एखादी सवय आवडत नसेल

आपली प्रतिक्रिया द्या