ती The Best

मयुरेश पेम

तुझी मैत्रीण मानसी पेम  (माझी आई)

तिच्यातली सकारात्मक गोष्ट खूप सकारात्मक आहे.

तिच्यातली खटकणारी गोष्ट खूपच भोळी आहे.

तिच्याकडून मिळालेली आतापर्यंतची सुंदर भेट माझा धाकटा भाऊ मनमीत

तिच्याकडून काय शिकलास? – तिच्याकडून मी नृत्याचे धडे घेतले. पैशाचा योग्य वापर कसा करायचा हे तिने मला शिकवले.

तिचा आवडता पदार्थ काजूकतली. गोड पदार्थ तिला खूप आवडतात.

ती निराश असते तेव्हा एकटी राहते.

दोघांचे भेटण्याचे ठिकाण? – कोकणातल्या घरी आम्ही सगळे कुटुंबीय एकत्र जमतो किंवा विकेंडला कोणत्याही एका मित्राच्या घरी माझे मित्र आणि त्या सगळ्यांचे आई-बाबा आम्ही सगळेच भेटतो.

तिच्यासोबतचा अविस्मरणीय क्षण? – एकापेक्षा एकमध्ये पहिल्या एपिसोडला मी खूप निराश झालो होतो, पण तिने मला खूप आधार दिला. त्यामुळे मला यश मिळाले. माझ्या आईने आतापर्यंत मी ज्या एकांकिका केल्या होत्या त्याची एक छोटी व्हिडियो क्लिप बनवली आणि माझ्या तालमीतल्या आठवणी त्यामध्ये जपल्या होत्या. ती क्लिप तिने मला ऑल दी बेस्ट-२ या नाटकाच्या पहिल्या प्रयोगावेळी दाखवली आणि सांगितले की, ऑल दी बेस्टचे५ हजार प्रयोग झाले. त्याप्रमाणे तू या नाटकाचे ५ हजार प्रयोग करशील, असा आत्मविश्वास तिने निर्माण केला.

तू चुकतोस तेव्हा ती काय करते? – शाळेत होतो तेव्हा ती फटके द्यायची. आता अभ्यासाबाबत ती स्ट्रिक्ट आहे. मी चुकलो तर ती माझी चूक मला तोंडावर दाखवून देते आणि त्यातून मार्ग कसा काढायचा हेही सांगते.

भांडण झाल्यावर काय करता? – खूप भांडतो, त्यानंतर जेवढे आम्ही भांडतो तेवढय़ा प्रेमानेच आम्ही एकत्र येतो.

दोघांपैकी जास्त राग कोणाला येतो ?   मला येतो.

तिचं वर्णन ती खूप प्रेमळ, सुंदर आहे.

तुझी एखादी तिला आवडणारी सवय मी शेवटच्या क्षणापर्यंत काही गोष्टी पेंडिंग ठेवतो. नियोजन करत नाही त्यामुळे निराश होतो. तत्परतेने निर्णय घेत नाही.

तुझ्या दृष्टीने मैत्रीची व्याख्या? – मैत्रीचं नातं कधीही तुटणारं नसावं.

तुला कशी हसवते ? – मला जे आवडत नाही त्या गोष्टी करणार. उदा. तिने गायलेलं गाणं मला ऐकायला आवडत नाही ते गाणं मी चिडल्यावर, रागवल्यावर मुद्दाम गाऊन दाखवणार किंवा नाटकातले संवाद बोलून दाखवून मला हसवणार.

एकत्र पाहिलेले नाटक/सिनेमा ? – काँज्युरिंग-2, सही रे सही.

तिच्याशी मैत्री का करावीशी वाटली ? – मी बॉम्बे जर्नी शाळेत शिकत होतो. त्यानंतर मी पार्ले टिळक शाळेत जाऊ लागलो. त्या शाळेतलं माझं पहिलं वर्ष मित्र बनवण्यात गेलं. तो काळ माझ्यासाठी कठीण काळ होता. तेव्हा मला आईने खूप सांभाळून घेतलं आणि माझी आईबरोबर मैत्री झाली. एखादी गोष्ट आईला कशी सांगायची, असं मला वाटत नाही. तिच्याही काही ऑफिसमधल्या अडचणी ती मला सांगते.