श्रीलंकेचा नाणेफेक जिंकून प्रथम पोहण्याचा निर्णय, नेटिझन्सने घेतली फिरकी

12

सामना ऑनलाईन । मुंबई

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत मैदानावर खेळाडूंऐवजी पावसाचा खेळ जास्त सुरू आहे. पावसामुळे आतापर्यंत तीन लढती रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चाहत्यांची मात्र निराशा होत आहे.

मंगळवारी 11 जूनला श्रीलंका आणि बांगलादेश संघात होणारा सामना पावसामुळे वाया गेला. एकही चेंडू न टाकता हा सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी आपली निराशा व्यक्त केली असून या दिवसात इंग्लंडसारख्या देशात वर्ल्डकप आयोजनाचे प्रयोजन काय असा सवाल केला आहे. तसेच काहींनी तर मैदानावर साचलेले गुडघाभर पाणी पाहून ‘श्रीलंकेचा नाणेफेक जिंकून प्रथम पोहण्याचा निर्णय’, असे ट्वीट करून खिल्लीही उडवली.

eng

वर्ल्डकप सुरू झाल्यापासून पावसाचे ग्रहण लागलेले आहे. 4 जून रोजी श्रीलंका आणि अफगाणिस्तान लढतीतही पावसाने व्यत्यय आणला होता. त्यामुळे षटकं कमी करण्यात आली होती. हा सामना डकवर्थ ल्यूईसच्या नियमानुसार श्रीलंकने 34 धावांनी जिंकला होता. त्यानंतर 7 जूनचा पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका आणि 11 जूनचा बांगलादेश विरुद्ध श्रीलंकेचा सामना एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. त्याआधी 10 जूनला झालेला दक्षिण आफ्रिका सामना 7.3 षटकांची गोलंदाजी झाल्यानंतर पावसामुळे रद्द झाला होता. त्यावेळी आफ्रिकेची स्थिती 2 बाद 29 अशी होती.

wc

आतापर्यंत तीन लढती रद्द झाल्या आहेत, तर एकाचा निकाल डकवर्थ ल्यूईसच्या नियमाने लागला आहे. आगामी काळातही वर्ल्डकपवर पावसाचे सावट असल्याने चाहत्यांची निराशा होण्याची शक्यता आहे. याचा फटका मोठ्या संघांना बसण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या