सोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन


सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात थोडी उसंत सगळ्यांनाच हवी असते. पण त्यासाठी कुटुंबातील सगळ्यांच वेळेच गणितही जुळुन येण गरजेचं असतं. ते न जुळल्यामुळे मग ठरलेल्या सहली कॅन्सल कराव्या लागतात. मूडची पार वाट लागते. पण आता याला पर्याय म्हणून सोलो टूरिझम फॉर्मात येऊ लागलय. ज्यात एकट्यानेच सहलीचा आनंद घेता येतो. चला तर मग जाणून घेऊ या देशातील सोलो पिकनिक स्पॉटबद्दल.

nainitalनैनिताल
उत्तराखंडमधलं नैनिताल म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग. येथील प्रेमळ लोक मनापासून पाहुण्यांच आदरातिथ्य करतात. शिवाय सुरक्षिततेच्या दृष्टीनेही नैनिताल सुरक्षित आहे. यामुळे एकट्याने फिरायला येणाऱ्या पर्यटकांची खास करुन महिलांची संख्या येथे सर्वाधिक आहे.

mysoreम्हैसूर
कर्नाटकमधलं सांस्कृतिक शहर म्हणून म्हैसूर ओळखलं जातं. नैनिताल नंतर पर्यटनासाठी सुरक्षित शहर म्हणून म्हैसूरचे नाव घेतले जाते. येथील रस्ते दिवस रात्र माणसांनी गजबजलेले असतात.
पाहुण्यांचं आदरातिथ्य मनापासून करण्याची यांची संस्कृती आहे. महिलांच्या सुरक्षेची येथे विशेष काळजी घेतली जाते.

shimlaशिमला
हिमाचल प्रदेशमधलं शिमला हे हिल स्टेशन देशातील लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. बाराही महिने येथे मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. यामुळे गजबजलेले पर्यटनस्थळ म्हणूनही शिमला ओळखलं जातं. साधी पहाडी माणस मोठ्या प्रेमाने तुमच स्वागत करतात. घरातल्या माणसांप्रमाणेच तुमची काळजी घेतात. यामुळे येथे एकट्याने जरी फिरायला आलात तरी एकटेपणा जाणवत नाही.

khjuraoखजुराहो
युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून दर्जा दिलेल्या खजुराहोला एकदातरी नक्की जावं.पर्यटकांसाठी सुरक्षित असलेलं ठिकाण म्हणून खजुराहो परिचित आहे.

pondecherryपॉंडेचरी
निरव शांतता हवी असेल तर पॉंडेचरीला जायलाच हवं. येथील फ्रेंच सिटी बघून फ्रान्समध्ये आल्याचा भास होतो. खूप सुंदर स्वच्छ नीटनेटक शहर असलेल्या पॉंडेचरीमध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येतात.

sikkimसिक्कीम
पर्वत रांगामध्ये वसलेल्या सिक्कीमच्या सौंदर्यासाठी शब्दही अपुरे पडतात. येथे असलेले बुध्दविहार तुमचा मनावरचा ताण हलका करतात. मन शांत करतात. येथील आल्हाददायक वातावरणात सगळा थकवा दूर होतो. अनेकजण एकटेच येथे फिरायला येतात. येथून उर्जा घेऊन मायदेशात परततात.