सडपातळ पोट

आजच्या वेगवान जीवनशैलीमुळे जेवण वेळच्या वेळी नाही, त्यात मसालेदार, चटपटीत खाणे यामुळे पोटाचा घेर कधी वाढतो कळतही नाही. सिक्स पॅकचे स्वप्न स्वप्नचे राहतेलठ्ठपणापेक्षा हे वाढलेले पोट फार त्रासदायक होते याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल. मुळात पोटाची चरबी घटवणं एकवेळ सोपं होईल, पण पोटाखालची चरबी कमी करणं फार कठीण असतं. आपली इच्छा असो वा नसो, कॉलेजच्या धबडग्यात वजन वाढतंच. काहीजणांचं शरीर सर्वसाधारण दिसतं, पण पोटाचा घेर मात्र प्रचंड वाढलेला असतो. काही खाद्यपदार्थ आहारात नियमित ठेवल्यामुळे पोटाचा घेर कमी करायला मदत होऊ शकते.

 • सर्वात पहिला उपाय म्हणजे पोटाखालची चरबी कमी करण्यासाठी किमान 7 ते 8 ग्लास पाणी दररोज पिणे गरजेचे आहे. यामुळे शरीरातील वाईट घटक बाहेर निघून जातात आणि पचनशक्ती सुधारते.
 • आहारात मिठाचे प्रमाण जितके कमी करता येईल तेवढे करा. कारण मिठातील सोडियममुळे शरीरात पाण्याचे प्रमाण वाढते आणि लठ्ठपणा वाढतो. त्यासाठी त्रिफळा खा आणि वजन कमी करा. आवळा किंवा आवळ्याचा रस घेऊ शकता.
 • मध खा… लठ्ठपणा किंवा पोटाखालची चरबी कमी करायची तर साखरेचे प्रमाण घटवून त्याऐवजी मध खायला सुरुवात करा.
 • सकाळी कॉफी किंवा चहामध्ये दालचिनी पावडर घालून रक्तातील शुगर नियंत्रणात ठेवू शकाल. आहारातून साखर घालवण्याचा हा एक चांगला पर्याय ठरू शकेल.
 • सुका मेवा नियमित खाल्ल्यास शरीरातील चरबी कमी होऊ शकते. बदाम, शेंगदाणे किंवा अक्रोड नियमित खा. सुक्या मेव्यात चरबी वाढवणारे घटक असतात हे खरे, पण ही चरबी आरोग्यदायी असते. शरीरासाठी ती गरजेची असते.
 • लठ्ठ माणसांना भूक आवरत नाही. पण जेव्हा भूक लागेल तेव्हा आपल्याजवळ ठेवलेले संत्रे खा. यामुळे पोट तर भरतेच, पण लठ्ठपणाही वाढत नाही.
 • आहारात नियमितपणे दही असेल तर त्यामुळे सडपातळ होता येईल. आरोग्याला अपायकारक असे डेजर्ट खाण्यापेक्षा दही खा. यात खूप पोषकद्रव्ये असतात, पण कॅलरीज अजिबात नसतात.
 • दिवसभरातून किमान एक कप ग्रीन टी घेतल्यास त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोटाखालची चरबी कमी व्हायला मदत होते.
 • ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमीन-सी मुबलक असते. त्यामुळे शरीरातील चरबी ऊर्जेमध्ये परावर्तीत करण्याची शक्ती असते.
 • पोटाचा घेर कमी करण्यासाठी लिंबू फायदेशीर आहे. दररोज सकाळी लिंबूपाणी प्या. यामुळे चरबी कमी होईल. यातले पाणी कोमट असेल तर जास्त चांगले. कोमट लिंबूपाण्यात थोडे मध घालून प्यायले तर सोन्याहून पिवळे.
 • कच्च्या लसणामुळेही पोटाखालची चरबी कमी होऊ शकते. या कच्च्या लसणावर थोडा लिंबाचा रस शिंपडाल तर बेस्ट. यामुळे पोटाचा घेर कमी होईलच, पण त्याबरोबरच रक्तप्रवाहही चांगला वाहू लागेल.
 • जेवणात नेहमी आलं असलं पाहिजे. कारण आल्यामुळे पोटाखालची चरबी हमखास कमी होते. आल्यामध्ये ऍण्टीऑक्सिंडट असतात. ते इन्शुलिन वाढण्यापासून रोखण्याचे काम करते आणि रक्तातील शुगरही नियंत्रणात ठेवते.