भक्ती चव्हाण ‘ऊर्जा ब्रेन अबॅकस’ राष्ट्रीय स्पर्धेत द्वितीय


सामना प्रतिनिधी । बुलढाणा

स्थानिक राजश्री ग्लोबल शाळेची विद्यार्थिनी भक्ती संतोष चव्हाणने ‘ऊर्जा ब्रेन अबॅकस’ या राष्ट्रीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. स्व.ध.दि. रहाटे शिक्षण व बहुउद्देशीय संस्थेंतर्गत राजश्री ग्लोबल स्कुल मेहकर येथे वर्ग ३ री मध्ये शिक्षण घेत असलेली भक्ती संतोष चव्हाण हिने नागपूर येथे झालेल्या ६ जानेवारी रोजी ‘ऊर्जा ब्रेन अबॅकस’ स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत सेकंड लेव्हल मध्ये द्वितीय क्रमांक पटकावून राजश्री ग्लोबल स्कुलला मानाचे स्थान मिळवून दिले. तिच्या या घवघवीत यशाबद्धल संस्थेचे अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव तसेच संस्थेचे सचिव ऋषी जाधव, प्रा.डॉ. सचिन जाधव, संस्थेचे सीईओ गणपतराव रहाटे, राजश्री ग्लोबल स्कुलच्या प्राचार्या सरिता खंडेलवाल, मनोहर म्हळसने, प्रा. गजानन घायाळ या सर्वांनी या विद्यार्थिनीला पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन सर्वांनी तिचे कौतुक केले. शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी तिचे अभिनंदन केले.