खासदार नाना पटोले यांना अर्धांगवायूचा झटका


सामना ऑनलाईन । भंडारा

भंडारा-गोंदियाचे भाजप खासदार नाना पटोले यांना अर्धांगवायूचा झटका आला आहे. त्यांना नागपूरच्या मेडिट्रीना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शिवणीबाध येथे विदर्भस्तरिय जलतरण स्पर्धेचे उद्घाटन करतेवेळी पटोले चक्कर येऊन कोसळले. त्यांना नागपूरच्या मेडिट्रीना रुग्णालयात दाखल करण्यात आले.