भरत जाधव यांनी साकारली मोरूची मावशी

सामना ऑनलाईन । मुंबई

दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांनी अजरामर केलेली ‘मोरूच्या मावशी’ची भूमिका अभिनेते भरत जाधव यांनी पुन्हा जिवंत केली आहे. सोनी मराठीवरील हास्य जत्रेच्या गणेशोत्सव स्पेशल कार्यक्रमात भरत जाधव यांनी मोरुची मावशी साकारली होती. भरत जाधव यांच्या या स्पेशल अॅक्टमुळे तेथे उपस्थित सर्वांचे डोळे पानावले.

सोनी मराठीवर नुकताच ‘उत्सव गणरायाचा, महोत्सव हास्यजत्रेचा’ हा कार्यक्रम पार पडलाा. या कार्यक्रमात विनोदवीर नम्रता आवटे–संभेराव, समीर चौघुले, विशाखा सुभेदार आणि प्रसाद खांडेकर यांनी हास्याचा तडका दिला. सेटवर हास्याचा कल्लोळ सुरू असतानाच अचानक मोरूच्या मावशीच्या रुपात भरत जाधव अवतरले त्यांनी ‘टांग टिंग टिंगाक’ करत विजय चव्हाण यांना आदरांजली वाहिली.