अभिनेत्री भारतीचे ३ डिसेंबरला लग्न

सामना ऑनलाईन । मुंबई

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कॉमेडी अभिनेत्री भारती सिंग हिने तिचा लाँग टाईम बॉयफ्रेंड हर्ष लिंभाछिया यांच्यासोबत ‘सात फेरे’ घेण्याचे निश्चित केले असून ३ डिसेंबरला ते दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. या बाबतची माहिती खुद्द भारतीनेच दिली असून तिने हर्षसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. ‘ त्याने माझे हृदय चोरले आणि मी ३ डिसेंबरला त्याचे आडनाव चोरणार आहे’. अशी कॅप्शनही भारतीने फोटोला दिली.

हा विवाहसोहळा गोवा येथे पार पडणार आहे. काही दिवसांपूर्वीच भारती आणि हर्ष अमृतसरच्या सुवर्णमंदिरात गेले होते. तसेच एका मुलाखतीदरम्यान भारतीला तुला हनिमुनला कुठे जायला आवडेल हा प्रश्न विचारला असता तिने आम्ही चांगल्या ठिकाणांचा विचार करीत असून स्पेन, फ्रांस, यांसारख्या ठिकाणांची नावे आमच्या यादीत आहेत, असे तिने सांगितले होते.