Loksabha 2019 पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात रावण लढणार निवडणूक

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार संघ असलेल्या वाराणसीतून त्यांच्या विरोधात भीम आर्मीचा प्रमुख चंद्रशेखर आझाद उर्फ रावण निवडणूक लढवणार असल्याचे समजते. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झाली नाही. मात्र आझाद यांनी आज भीम आर्मीच्या दिल्लीतील हुंकार रॅलीत याबाबत सांगितले.

chandrashekhar-azad-1

‘मोदी हे दलितविरोधी आहेत. मी जेव्हा वाराणसीतून निवडणूक लढवणार हे त्यांना समजलं त्यांनी एका कार्यक्रमात आमच्या बांधवांचे पाय धुतले. मी आता वाराणसीला जात आहे. त्यांचा पराभव करण्यासाठी मला तुमची गरज आहे’, असे यावेळी आझाद यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र अद्याप ते कोणत्या मतदारसंघातून लढणार असल्याचे जाहीर केलेले नाही.