LIVE: भीमा-कोरेगाव घटनेचे पडसाद, जिग्नेश मेवाणीविरोधात FIR

चेंबूर येथील शिवाजीनगर परिसरात आंदोलकांनी बसला आग लावली (फोटो: सचिन वैद्य)

सामना ऑनलाईन । मुंबई

भीमा कोरेगावमध्ये झालेल्या घटनेनंतर महाराष्ट्रातील वातावरण चिघळले असून मुंबईसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी रास्ता-रोको, रेल रोको करण्यात येत आहे. राज्यातील घटनांचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत.

अफवांवर विश्वास ठेवू नये अशी विनंती पोलीस आणि प्रशासनाकडून करण्यात आली आहे. तसेच राज्यातील आंदोलकांनी शांतता आणि संयम बाळगावा असेही आवाहन करण्यात आले.

Live: मुंबईसह राज्यातील विविध भागांच्या स्थितीचे अपडेट

 • जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांच्याविरोधात पुण्यात डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, चिथावणी देणारे भाषण केल्याचा तसेच देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप
 • सर्व हिंसक घटनांच्या चौकशी आणि दोषींवर कारवाई करण्याचे आदेश, राज्य सरकारने दिले आदेश
 • राज्यातील परिस्थिती नियंत्रणात, राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली माहिती
 • सीसीटीव्ही फूटेजआधारे हिंसा करणाऱ्यांविरोधात पोलीस कारवाई सुरू
 • बेस्टच्या २० बसचे नुकसान, एसटी महामंडळाच्या १६७ बसचे नुकसान
 • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुण्यातील कार्यक्रम रद्द, पुण्यात ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेणार होते
 • …म्हणून आंदोलन चिघळलं, प्रकाश आंबडेकर यांचा दावा
 • भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंदची डॉ. प्रकाश आंबेडकर यांची हाक
 • रमाबाई नगरातील दलित बांधवांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार
 • आतापर्यंत १०० हून अधिक आंदोलक विविध ठिकाणाहून घेतले ताब्यात
 • रेल्वेची हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन दिशेची लोकल वाहतूक सुरळीत सुरू
 • दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांच्या गाडीवर हल्ला
 • संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
 • दुपारी ४ वाजेपर्यंत महामंडळाच्या १३४ एसटीचे नुकसान
 • कुर्ला चेंबूर कुंभारवाडा मुलुंड परिसरात बेस्टच्या २० गाड्या विविध ठिकाणी फोडल्या
 • चेंबूर येथील शिवाजीनगर परिसरात आंदोलकांनी बसला आग लावली (फोटो: सचिन वैद्य)

 

 

 • सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी, पोलिसांची मोठा फौजफाटा रस्त्यावर
 • शहरातील परिस्थितीची पाहाणी करण्याकरता डीसीपी शहाजी उमाप रस्त्यावर
 • चेंबूर येथे तणावाचे वातावरण, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा बाजी

पूर्व द्रूतगती मार्गावर विक्रोळी ते सायन दरम्यान वाहनांची लांबच लांब रांग

 • पूर्व महामार्गावरील रमाबाई नगर येथील ठाण्याकडे जाणारी वाहतूक सुरू झाली
 • मुंबईकडे येणारा मार्ग पूर्णपणे रोखला, चेंबूर मानखूर्दमध्ये आंदोलक अद्यापही रस्त्यावर असल्याची माहिती
 • कुर्ला येथे महिलांचा रास्ता रोको
 • kurla-rasta-roko
 • दीड वाजल्यापासून बंद असलेली हार्बर मार्गावरील लोकल सेवा सुरू झाली
 • ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर गांड्याच्या रांगा. कुर्ला उड्डाणपूलावर रास्तारोको
 • kurla-flyover
 • अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करणार – मुख्यमंत्री
 • भीमा कोरेगाव घटनेची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती
 • देवनार पालिका वसाहतीत ३५७ रूटवरील बेस्ट फोडली
 • वडाळा, ॲण्टाॅप हिल परिसरात तणाव पूर्ण शांतता
 • एनडीटीव्हीचे पत्रकार सुनील सिंग यांच्यावर आंदोलकांचा हल्ला, सुनील सिंग सुरक्षित
 • खबरदारीचा उपाय म्हणून काही शाळा सोडण्यात आल्याअसून विद्यार्थ्यांना सुरक्षित घरी पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती
 • मुंबईच्या मुलुंड, चेंबुर, सायन, गोवंडी येथे दुकानं बंद
 • चेंबुर परिसरात संवेदनशील भागात पोलीस तैनात, परिस्थितीवर नियंत्रण
 • मुलुंडच्या पाच रस्ता भागात भीमसैनिकांचे आंदोलन, रास्तारोकोमुळे वाहतुकीला अडथळा
 • रमाबाई नगर घाटकोपर येथे तणाव, आंदोलक रस्त्यावर, परिसरात वाहतूक कोंडी

 

मुंबईतील घटना, रेल्वे रोखली

मुंबईतील हार्बरमार्गावरील चेंबूर येथे लोकांनी काही काळ रेल्वे रोखून धरली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणा देत निषेध करण्यात आला. त्यानंतर चेंबूर गोवंडी भागात रास्तारोकोही करण्यात आला. तसेच ठाणे, नगर, संभाजीनगर या शहरातही रास्तारोको करण्यात आल्याचे कळते. रास्तारोकोमुळे काही भागात वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, आंदोलकांना पोलिसांनी हटवल्यानंतर हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

पुणे सासवड मार्गावर दगडफेक

समाजकंटकानकडून पुणे सासवड मार्गावर भेकराईनगरला पीएमपीएल व एस.टी बसमध्ये प्रवासी प्रवास करीत असताना दगडफेक केली व काचा फोडल्या. प्रवासी सुखरूप आहेत.हडपसर पोलीस घटनास्थळी दाखल. साडेअकरा वाजता दगडफेकीची घटना घडली आहे. सध्या वाहतूक सुरळीत चालू आहे.

राहाता शहरात आंदोलनाला हिंसक वळण…

भीमा कोरेगावमधील घटनेच्या विरोधात आंदोलकर्त्यांनी तीन बसेसच्या काचा फोडल्या. यामध्ये बसमधील तिन प्रवासी जखमी झाले आहेत.

देवळाली-मनमाड कडकडीत बंद

नाशिकमधील देवळाली तसेच मनमाड येथे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बंदची हाक दिली. त्यामुळे सकाळपासूनच या शहरातील प्रमुख बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. या भागात सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या शहरांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

भीमा-कोरेगावमध्ये आज शांतता…

कोरेगाव ते पेरणे फाटय़ादरम्यान सोमवारी सकाळी ११ वाजता अज्ञातांनी वाहनांवर दगडफेक करत जाळपोळही केली होती. त्यात ४० हून अधिक कार आणि इतर वाहनांचे नुकसान झाले. तसेच तणावामुळे कोरेगाव वढू, सणसवाडी, शिक्रापूर, पेरणे ही महामार्गालगतची गावे बंद ठेवण्यात आली होती. मात्र आज परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात आलं आहे.

अफवांवर विश्वास ठेऊ नका…

भीमा-कोरेगाव घटनेसंदर्भात अफवा पसरवण्यात येत असून त्यावर विश्वास ठेऊ नका असे आवाहन राज्य सरकार आणि पोलिसांकडून करण्यात आले आहे.