आम्ही आंदोलन केलं तर ते कोणालाच परवडणारे नसेल!

106

सामना ऑनलाईन । सांगली

भीमा कोरेगाव प्रकरणानंतर अधिक चर्चेत आलेल्यांपैकी एक नाव म्हणजे शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना भडकवून हिंसाचार घडवल्याचा आरोप दलित संघटनांकडून केला जात आहे. मात्र भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या घटनेशी भिडे गुरुजींचा काहीही संबंध नाही. भिडे गुरुजींवर दाखल झालेला गुन्हा मागे घ्यावा. खोटे आरोप करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांची चौकशी करावी, अशी मागणी करत त्यांच्या समर्थनात सांगतील आज रॅली काढण्यात आली. आम्ही आंदोलन केलं तर ते कोणालाच परवडणारे नसेल, असा इशारा देण्यात आला.

भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे (गुरुजी) आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या अटकेची मागणी करत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ४ जानेवारी रोजी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला होता. अद्यापही ते या दोघांच्या अटकेच्या मागणीवर ठाम आहेत.

याच दरम्यान, भिडे गुरुजी यांच्या समर्थनात रॅली काढताना त्यांना मुद्दाम गोवण्यात आल्याची भूमिका समर्थकांकडून मांडण्यात आली. तसंच महाराष्ट्र बंदमध्ये तोडफोड करणाऱ्यांकडून नुकसान भरपाई वसूल करावी, अशा मागण्या या रॅलीतून करण्यात आल्या.

पाहा रॅलीचा व्हिडिओ:

आपली प्रतिक्रिया द्या