पायावरील जखमेमुळे भिवंडी दंगलीतील आरोपी सापडला, 12 वर्षांनी गजाआड

56

सामना ऑनलाईन । भिवंडी

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेवर बांधण्यात येणाऱ्या पोलीस ठाण्याच्या बांधकामास रझा अकादमी या संघटनेने विरोध केल्यानंतर 5 जुलै 2006 रोजी भिवंडीत उसळलेल्या दंगलीच्या आरोपीला 12 वर्षांनी बेडय़ा ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. या दंगलीत दंगेखोरांनी दोन पोलीस कर्मचाऱयाचा बळीही घेतला होता. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या मोईनुद्दीन मोमीन (35) याच्या पायाच्या जखमेकरून त्याला गजाआड केले.

भिवंडीतील वोटरगेट – कसाईवाडा येथील सरकारी जागेवर नवीन पोलीस ठाण्याचे बांधकाम सुरू असताना धर्मांध मुस्लिमांच्या 400 ते 500 जणांच्या गटाने पोलिसांवर जोरदार दगडफेक सुरू केली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूरांच्या नळकांड्या फोडल्या. मात्र तरीही जमाव काबूत येत नसल्याने अखेर जमावाच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. या गोळीबारातील एक गोळी मोईनुद्दीनच्या डाव्या पायाला लागली होती. ती गोळी त्याने गुपचूपपणे डॉक्टरांकडे काढून घेतली. ही बाब पोलिसांच्या खबऱ्याने तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना सांगितले असता पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पायाची जखम ही बंदुकीच्या गोळीची नसून दगड लागल्याने झाल्याचे सांगून त्याने वेळ मारून नेली. अखेर पोलिसांनी वैद्यकीय तपासणीचा निर्णय घेऊन मोईनुद्दीनला जखमेच्या पायाच्या तपासणीसाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात पाठवले. रुग्णालयात त्याच्या पायाची वैद्यकीय तपासणी केली असता पायात बंदुकीची गोळी लागल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

आपली प्रतिक्रिया द्या