भिवंडीजवळ पर्यटकांवर गावकर्‍यांचा हल्ला, एक लहानगा जखमी

20

सामना ऑनलाईन । भिवंडी

सहलीला गेलेल्या समुहावर भिवंडीमध्ये गावकर्‍यांनी लाठ्या काठ्याने आणि दगडाने हल्ला केला. या हल्ल्यात सहलीला आलेल्या एक लहान मुलगा जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवण्यासाठी विलंब लावला असा आरोप या सहलील्या आलेल्या समुहाने केला.

कल्याणमधील रहिवासी असलेले काही लोक सहलीसाठी खडवली नदीजवळ गेले होते. सहलीतील लोक दोन गाड्या आणि एक मिनी बस घेऊन कल्याणकडे परतत असताना त्यांच्या कारचा आणि एका बाईकचा अपघात झाला. हा अपघात बाईकस्वाराच्या चुकीने झाल्याचा आर्प पर्यटकांनी केला होता. बाईकस्वाराने मात्र अपघात कारवाल्याच्याच चुकीने झाला असून त्याने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करायला सुरूवात केली. यातून बाईकस्वार आणि पर्यटकांमध्ये वाद निर्माण झाला. पर्यटकांची संख्या जास्त असल्याने तिथे बाईकस्वाराने थोडं नमतं घेतलं,ज्यामुळे पर्यटक तिथून निघून गेले.

पुढे गेल्यानंतर 15 जणांच्या टोळक्याने पर्यटकांच्या मिनी बसवर हल्ला चढवला. काहींनी बस चालकाला बांबूने मारहाण केली आणि दगडफेकही करण्यात आली. या दगडफेकीत बसमधील लहान मुलगा जखमी झाला आहे. या घटनेचे एक व्यक्ती चित्रीकरण करत होती, त्यालाही टोळक्याने मारहाण केली असून व्हीडिओ डिलीट करायला लावला.

पर्यटक जेव्हा पोलीस स्थानकात पोहोचले तेव्हा तिथले ग्रामस्थ आधीच पोहोचले होते. त्यांनी ही तक्रार नोंदवली जाऊ नये यासाठी पोलिसांवर दबाव टाकला. एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार सुलेमान नावाच्या एका व्यक्तीने पोलिसांना शिवीगाळही केली.

आपली प्रतिक्रिया द्या