सामना ऑनलाईन, चांदवड

नाशिकजवळ पोलिसांनी एक मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. पकडण्यात आलेल्या शस्त्रसाठ्यात २५ रायफल,१५ पिस्तुल आणि सुमारे ३ हजार जिवंत काडतुसांचा समावेश आहे.

nashik-arms-haul-2

मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या चांदवडच्या  टोलनाक्यावर पोलिसांनी मुंबईकडे जाणाऱ्या बोलेरो गाडीला अडवलं, या गाडीची झडती घेतली असता यामध्ये हा शस्त्रसाठा सापडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. सलमान खान (रा.शिवडी,मुंबई) नागेश बनसोडे(रा.नाशिक) आणि बद्रजुमान बादशहा (रा.शिवडी,मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

nashik-arms-haul-3

मालेगावच्या एका पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरल्यानंतर त्याचे पैसे न देता रिव्हॉल्व्हर दाखवून पळून गेले.पंप चालकाने मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना घटनेची माहिती दिली त्यांनी तातडीने चांदवड पोलिसांशी संपर्क करून नाकाबंदी करण्याचे आदेश दिले .त्यानुसार नाकेबंदी केल्या नंतर या बोलेरोला टोलनाक्या जवळ अडविण्यात आले. यावेळी गाडीत बसलेल्या आरोपींनी पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसही तयार असल्याने या आरोपींचा प्रयत्न फसला आणि आरोपींना अटक करण्यात आली.

  • mahendrapadalkar

    हे जागरुक व तत्पर पोलिसांचे यश आहे.