तो परत आलाय! ‘बिग बॉस’ मराठीच्या दुसऱ्या सीजनला दणक्यात सुरुवात

13

सामना ऑनलाईन । मुंबई

‘कलर्स’ मराठीवरील ‘बिग बॉस’ मराठीच्या दुसऱ्या सीजनमध्ये कोणते सदस्य असणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. याबाबत गेल्या महिनाभरापासून अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर रविवारी रात्री पार पडलेल्या ग्रॅण्ड प्रीमियरमध्ये सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी या सस्पेन्सवरून पडदा हटवला.

अभिजित केळकर
दिगंबर नाईक
किशोरी शहाणे
माधक देवचके
मैथिली जावकर
नेहा शितोळे
पराग कान्हेरे
रूपाली भोसले
शिक ठाकरे
शिवानी सुर्वे
सुरेखा पुणेकर
वैशाली माडे
वीणा जगताप
विद्याधर जोशी
अभिजित बिचुकले

…असे आहे ‘बिग बॉस’चे घर

‘बिग बॉस’चे घर उमंग कुमार यांनी डिझाईन केले आहे. यंदा लोणावळय़ाऐवजी गोरेगावच्या फिल्मसिटीत 14 हजार चौरस फूट अशा भव्य जागेमध्ये बिग बॉसचे घर उभारले आहे. या घराला मराठमोळय़ा वाडय़ाचे स्वरूप दिले आहे. घरात घुसताच समोर तुळशी वृंदावन लक्ष वेधते. स्विमिंग पूल, व्यायामशाळा, स्मोकिंग झोनदेखील आहे. याशिवाय यंदा पहिल्यांदाच जेल तयार करण्यात आले असून त्याला अडगळीची खोली असे नाव दिले आहे. घराच्या प्रवेशद्वारावर वारली पेंटिंगने केलेली सजावट, वेगवेगळय़ा आकाराचे दिवे घराचे आकर्षण आहे. अनेक छोट्यामोठ्या गोष्टींमधून मराठमोळी संस्कृती अधोरेखित होते.

या घरात टिकण्यासाठी सदस्यांना संघर्ष करावा लागणार आहे. या कार्यक्रमाचे आधीचे सर्व एपिसोड मी पाहिले असून टास्क समजावून घेतले आहेत. टास्कदेखील खेळायला मी समर्थ आहे – सुरेखा पुणेकर, लावणीसम्राज्ञी

मी सोशल मीडियाच्या फार आहारी गेली नसल्यामुळे मी मोबाईल फोनला फार मिस करणार नाही. या शोसाठी चार ते पाच सिनेमांवर मला पाणी सोडावे लागले. – किशोरी शहाणे-वीज, ज्येष्ठ अभिनेत्री

हिंदी आणि मराठी ‘बिग बॉस’चे सर्व सीजन मी पाहिले आहेत. पण मी आधीच्या कोणत्याही स्पर्धकाला फॉलो करणार नाही. मी जसा आहे तसाच घरात राहणार. लोकांनाही हेच आवडेल. – अभिजित केळकर अभिनेता

आपली प्रतिक्रिया द्या