बिग बॉस १२ मध्ये या जोडीसाठी मोजली सर्वाधिक फी, जाणून घ्या किती


सामना ऑनलाईन । मुंबई 

टीव्ही शो मध्ये सर्वाधिक चर्चिला जाणारा रिअॅलिटी शो बिग बॉस आपला १२ वा सीजन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आतापर्यंचे ११ सीजन हे लोकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत. त्यामुळे साऱ्यांनाच आता सीजन १२ची उत्सुकता लागून राहिली आहे.

१२ व्या सीजन निमित्त या शो मध्ये काही बदल करण्यात आले आहेत. दरवेळी प्रमाणे यावेळी देखील बॉलीवूड स्टार सलमान खान शो होस्ट करणार आहे. १६ सप्टेंबर पासून बिग बॉस-१२ सुरू होईल.

टीव्हीवर प्रसारित होण्याआगोदर या शोबद्दल प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत की, यंदा बिग बॉसच्या घरात कोणाला राहायची संधी मिळणार आहे, शोच्या फॉर्मेटमध्ये कोणते बदल असतील, कोणावर किती खर्च केला असेल.

कसा असेल शोचा फॉर्मेट?

बिग बॉस १२ पहिल्या सीजन पेक्षा बराच वेगळा असणार आहे. या शोमध्ये जोड्या बोलावले जातील. तसेच यामध्ये फक्त कपल जोड्या नसून मुलगा-आई, भाऊ-बहिण, सासू-सून, मामा- भाचा अशा जोड्या देखील पाहायला मिळणार आहेत.

शोमध्ये किती सेलिब्रिटी आणि किती कॉमन लोकं असणार?

यावेळी या शोमध्ये २१ कंटेस्टेंट असणार आहे. त्यामध्ये ३ सेलिब्रिटी कपल तसेच ३ कॉमन जोड्या असणार आहे. असे १२ कंटेस्टेंट असणार आहेत.

कोणाला किती पैसे मिळणार?

या शोमध्ये सगळ्यात जास्त फी ब्रिटिश डॅनी डी आणि शो मधली त्यांची पार्टनर माहिका शर्मा यांची असणार आहे. या दोघांना प्रत्येक आठवड्याचे ९५ लाख रुपये इतकी फी देण्याचे ठरले आहे, अशी माहिती मिळते.

summary :bigg boss 12 contestant list fees host highest paid jodi salman khan