मुंबईः वीज कोसळून तेलसाठ्याला लागली आग

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईजवळ बुचर आयलंड येथे असलेल्या तेलसाठ्यावर वीज कोसळली. वीज कोसळल्यामुळे तेलसाठ्याला आग लागली आहे. अग्निशमन दलाचे पथक आग विझवण्यासाठी रवाना झाले आहे. आगीच्या वृत्ताला मुंबई पोर्ट ट्रस्टने दुजोरा दिला आहे.

भारत पेट्रोलियम कंपनीच्या टँक क्रमांक १३ आणि १४ येथे वीज कोसळल्यामुळे आग लागली आहे, अशी माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टने दिली आहे.