झाडही गेलं, बोगदाही गेला उरल्या फक्त आठवणी


सामना ऑनलाईन, कॅलिफोर्निया

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील एक प्राचीन झाड जगप्रसिद्ध होतं. हे झाड नुकत्याच आलेल्या वादळात उन्मळून पडलं. जवळपास १३७ वर्षांपूर्वी या झाडाच्या खोडातून बोगदा करण्यात आला होता. ज्यातून असंख्य माणसे आणि फार पूर्वी गाड्याही ये-जा करायच्या.

tree-2

रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या या झाडाची असंख्य छायाचित्र प्रसिद्ध झालेली आहेत.अनेकांच्या चांगल्या-वाईट आठवणी या झाडाशी, त्यातील बोगद्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे या झाडाच्या पडण्याने अनेकांना दु:ख झालंय. द ‘कलवेरास बिग ट्री असोसिएशन’ने हे ऐतिहासिक झाड पडल्याची माहिती फेसबुकवरून प्रसिद्ध केली. ज्यावर २ हजार पेक्षा जास्त लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.