भाजप भगाओ… देश बचाओ! पाटण्यात १६ पक्षांची महारॅली

सामना ऑनलाईन । पाटणा

बीजेपी भगाओ, देश बचाओ असा नारा देत राजदचे लालू प्रसाद यादव यांच्या पुढाकाराने पाटणा येथील ऐतिहासिक गांधी मैदानात रविवारी विशाल रॅली झाली. या महारॅलीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव, जदयुचे बंडखोर नेते शरद यादव यांच्यासह १६ विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.

मी एकवेळ फासावर जाईन पण पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपसोबत हातमिळवणी करणार नाही. मोदी यांनी आजवर जनतेची फक्त दिशाभूलच केली आहे.
– लालूप्रसाद यादव

केंद्र सरकारला तीन वर्षे झाली. या काळात अच्छे दिन कुठे आलेत? कोणाला आले आहेत? देशात शेतकऱयांच्या आत्महत्या होताहेत आणि सामान्य माणूस भरडला जातो आहे.
– अखिलेश यादव

देश संकटात आहे, म्हणून भाजपला येथून पळवून लावावे लागेल. नसबंदीवरून इंदिरा गांधी सरकार गेले, तर नोटाबंदीमुळे मोदी सरकारलाही जावेच लागणार आहे.
– ममता बॅनर्जी

lalu1_crop_700x450