बिहारमध्ये महिलेची विवस्त्र धिंड काढली, 360 जणांवर गुन्हा दाखल

सामना ऑनलाईन। भोजपूर

बिहारमधील भोजपूर जिल्हयात भरदिवसा एका महिलेला विवस्त्र करुन मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिची गावभर धिंड काढण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी 360 जणांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला असून 15 जणांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी बिहीया रेल्वे स्टेशनजवळ विमलेश शहा (20) नावाच्या तरुणाचा मृतदेह सापडला होता. या हत्येमागे महिलेच्या कुटुंबाचा हात असल्याचा समज गावकऱ्यांचा झाला. त्यातूनच महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

सोमवारी दुपारी विमलेशचा मृतदेह सापडला होता. यामागे गावातील बदनाम वस्तीत राहणाऱ्या एका कुटुंबाचा हात असल्याचा संशय गावकऱ्यांना होता. त्यानंतर गावकऱ्यांनी रेड लाईट भागातील वस्तीवर हल्ला केला व 5 घरांना आग लावली. यावेळी आक्रमक झालेल्या जमावाने अनेक खासगी वाहनेही पेटवून दिली. पण एवढे करुनही जमावाचा राग शांत झाला नाही. यामुळे त्यांनी वस्तीमधील घरात घुसून बायका मुलांना बाहेर काढले. त्यावेळी पीडित महिला एकटीच घरात होती. जमावाने तिलाच लक्ष्य केलं. तिला विवस्त्र करण्यात आलं त्यानंतर तिला लाथा बुक्क्यांनी मारण्यात आलं. नंतर महिलेची गावात नग्न धिंड काढण्यात आली. लोकांनी 1 तास तिला गावात नग्नावस्थेत फिरवलं. विशेष म्हणजे ही घटना जेव्हा घडत होती तेव्हा पोलिसही तिथे होते. पण कोणीही जमावाला अडवण्याचा प्रयत्न केला नाही.

summary…  bihar fir lodge on 360 people for women striped naked