ब्ल्यूटय़ुथशी कनेक्ट होणारी स्मार्ट स्कूटर

सामना ऑनलाईन, मुंबई

टीव्हीएस कंपनीने तरुणांच्या पसंतीला उतरेल, अशी स्मार्ट टीव्हीएस एनटीओआरक्यू-१२५ दुचाकी बाजारात आणली आहे. या स्कूटरचे वैशिष्टय़ म्हणजे ही स्कूटर ब्ल्यूटय़ुथशी कनेक्ट होणार आहे. स्मार्ट एक्सोनेटला एनटीआओआरक्यू मोबाईल ऍप या अनोख्या मोबाईल ऑप्लिकेशनची याला जोड आहे. डिजिटल स्पीडोमीटर, नेव्हीगेशन असिस्ट, टॉप स्पीड रेकॉर्डर, इनबिल्ट लॅप टायमर, गेल्या वेळी स्कूटर कुठे पार्क केली होती, हे दाखवणारी सुविधा, सर्व्हिंसिंग रिमाईंडर अशा ५५ सुविधा यात देण्यात आल्या आहेत.