तरुणांकडून जंगलच्या राजाचा बाईकवरून पाठलाग!

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

गुजरातच्या गिर अभयारण्यात काही तरूणांनी बाईकवर सिंहांचा पाठलाग केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनानं या चार तरुणांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की दोन बाईकवर ४ तरूण सिंह आणि सिंहिणीचा पाठलाग करत आहेत, तर सिंह आणि सिंहीण त्यांच्यापासून बचाव करण्यातसाठी पळत आहेत.

संबधीत व्हिडिओ बुधवारी फेसबूकवर अपलोड करण्यात आला. त्यानंतर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला. प्रशासनाच्या हाती हा व्हिडिओ लागल्यानंतर त्यांना कारवाईस सुरुवात केली आहे. व्हिडिओत एका बाईकची नंबर प्लेट दिसत असून त्या आधारावर प्रशासन अधिक तपास करत आहे.