‘पीएम नरेंद्र मोदी’ 5 एप्रिलला भेटीला येणार

3

सामना ऑनलाईन, मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनप्रवासावरील  ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा बायोपिक 12 ऐवजी आता 5 एप्रिललाच रिलीज  होणार आहे. या सिनेमात मोदींचा जीवनप्रवास दाखवला जाणार आहे. प्रेक्षकांमध्ये या सिनेमाविषयीची उत्सुकता पाहता आठवडाभर आधीच सिनेमा रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे, असे निर्माते संदीप सिंग यांनी सांगितले.