पक्ष्यांचाही होतो घटस्फोट, शास्त्रज्ञांनी शोधली ब्रेकअपची कारणे

नात्यांमधील  अविश्वास  आणि त्यातून निर्माण झालेला दुरावा अशी विवाहित जोडप्यांच्या घटस्फोटाची कहाणी आहे, पण केवळ मानवी नात्यांमध्ये नव्हे, तर पक्ष्यांमध्येही ब्रेकअप होतो आणि त्याची काही कारणे आहेत.

साधारणपणे 90 टक्के पक्षी आयुष्यभर जोडीदाराशी एकनिष्ठ राहतात, असे मानले जाते. मात्र नवीन संशोधनाचा दावा वेगळा आहे.  नव्या संशोधनानुसार पक्ष्यांचे घटस्फोट होतात. पक्षीदेखील त्यांचा जोडीदार सोडून नवीन जोडीदारासोबत जीवन जगू लागल्याचे दिसत आहे. जर्मन आणि चीनच्या संशोधकांना ‘प्रोसिडिंग्ज ऑफ द रॉयल सोसायटी बी’ या जर्नलमध्ये  पक्ष्यांच्या 232 प्रजातींचे वर्तन कसे बदलले आहे, याचे वास्तव मांडले आहे.

मादी जास्त एकनिष्ठ

संशोधकांच्या म्हणण्यानुसार पक्ष्यांतील दुराव्यांची दोन कारणे आहेत. नर पक्ष्याचे एकापेक्षा जास्त जोडीदार असणे आणि दुसरे कारण म्हणजे स्थलांतर. मादी पक्ष्यांमध्ये हे वर्तन कमी प्रमाणात दिसून येते.