‘बिग बीं’चा ७५वा वाढदिवस मालदीवला

बीग बी अमिताभ बच्चन यांना भेंडीची भाजी खायला खूप आवडते.

सामना प्रतिनिधी, मुंबई

बिग बी अमिताभ बच्चन यांचा ७५वा वाढदिवस येत्या ११ ऑक्टोबर रोजी आहे. मात्र या दिवशी चाहत्यांना अमिताभ यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देणे तसे शक्य होणार नाही. कारण अमिताभ सहकुटुंब मालदीव बेटावर जाणार आहेत आणि तिथेच वाढदिवस साजरा करणार आहेत.

७५ वा वाढदिवस कुटुंबीयांच्या सहवासात शांत ठिकाणी करण्याची इच्छा अमिताभ यांची होती. त्यानुसार आता मालदीव येथे हा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी बिग बी यांनी केबीसीच्या शूटिंगमधून दोन दिवसांची सुट्टी घेतली आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी वाढदिवसाचे आठवडाभराचे प्लॅनिंग केले आहे. तसेच सर्व व्यवस्था केली आहे. यावेळी वाढदिवसाचे सेलिब्रेशन तसे खासगी असेल. अभिषेक यांचा ४० वा वाढदिवस मालदीवलाच साजरा झाला होता. तेव्हाच बिग बी यांना मालदीव खूप आवडले होते. त्यामुळेच ते आता मालदीवला जाणार आहेत.