राष्ट्रगीत सुरू असतानाच भाजप नगरसेवकांनी गायले वंदे मातरम्, सभागृहात गोंधळ

122

सामना ऑनलाईन । इंदुर

इंदुर महापालिकेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत सुरू असतानाच अचानक काही भाजप नगरसेवकांनी वंदे मातरम् म्हणण्यास सुरुवात केल्याने एकच गोंधळ उडाला. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, इंदूर महापालिकेत बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार होती. त्याआधी राष्ट्रगीत लावण्यात आले. यावेळी इंदूरच्या महापौर व स्थानिक भाजप आमदार मालिनी गौड देखील उपस्थित होत्या. राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर काही वेळातच काही भाजप नगरसेवकांनी अचानक वंदे मातरम् म्हणण्यास सुरुवात केली. एकीकडे राष्ट्रगीत सुरू असतानाच दुसरीकडे हे नगरसेवक वंदे मातरम् म्हणत होते. त्या नगरसेवकांनी वंदे मातरम् शेवटपर्यंत म्हटले. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला होता.

या घटनेनंतर विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी भाजप नगरसेवकांनी राष्ट्रगीताचा अपमान केला असल्याचा आरोप केला असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली. दरम्यान इंदुर महापालिकेचे अध्यक्ष अजय सिंग नरुका यांनी भाजप नगरसेवकांनी जाणून बुजून हा प्रकार केला नसून त्यांच्याकडून चुकून असे झाल्याचे सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या