Video : भाजप जिल्हाध्यक्षाचा मुजोरपणा, पोलिसाला म्हणाले ’गुंड’

तुषार सूर्यवंशी । चोपडा

चोपडा येथे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मारहाण केली. या प्रकरणी नरेंद्र पाटील यांच्यासह तिघांवर चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी प्रतिक्रिया देतांना पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील हे एक ’गुंड’ पोलीस अधिकारी असल्याचे म्हटले आहे. मागील वर्षी एका प्रकरणात शहराध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी न्याय मागितल्याने त्याचा राग आता अशा पध्दतीने काढले असल्याचे वाघ यांनी यावेळी सांगितले.

पोलीस जर गुंड असतील तर भाजपाचेच सरकार आहे. गृहमंत्री खुद्द मुख्यमंत्री आहेत तर अशा वेळी गृहमंत्रालय काय करत आहेत. पोलिसांना गुंड ठरवत असाल तर गुंडांना पोलीस ठाण्यात बसवणार का असा संतप्त सवाल नागरिकांमधून येत आहे.