Video : भाजप नेत्याची जीभ घसरली, दहशतवाद म्हणजे बलिदानाचे प्रतिक

1

सामना ऑनलाईन । भोपाळ

भाजपचे मध्य प्रदेशमधील अध्यक्ष राकेश सिंग यांनी आज प्रचार सभेत दहशतवाद म्हणजे बलिदानाचे प्रतिक असल्याचे म्हटले आहे. खरंतर राकेश सिंग यांना भगवा म्हणायचे होते. मात्र एकदम जोशात भाषण करत असताना त्यांची जीभ घसरली व ते भगव्या ऐवजी दहशतवाद बोलून चुकले.

भाजपच्या भोपाळच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी दिल्यानंतर विरोधकांनी त्यांना दहशतवादी म्हटले होते. त्यांच्या टिकेला उत्तर देताना राकेश सिंह यांची जीभ घसरली. ‘भगवा कधीही दहशतवाद होऊ शकत नाही. भगवा धारण करणारी व्यक्ती कधीही दहशतवादी होऊ शकत नाही. दहशतवाद तर प्रेम, तपस्या आणि बलिदानाचे प्रतिक आहे.’ असे वक्तव्य राकेश सिंह यांनी केले आहे.