मुस्लिमांना लोकसंख्या वाढवून वर्चस्व गाजवायचेय, भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान

सामना ऑनलाईन । जयपूर

मुस्लिमांना स्वत:ची लोकसंख्या वाढवून देशात वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. त्यासाठी ते डझनभर मुले जन्माला घालतात, असे वादग्रस्त वक्तव्य अलवारचे भाजप आमदार बनवारीलाल सिंघल यांनी केले आहे. राजस्थानमधील अलवार आणि अजमेर लोकसभा मतदारसंघात होणाऱया पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. अशा आशयाची पोस्ट त्यांनी फेसबुकवर टाकली आहे.

माफी मागण्याऐवजी त्यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य करून वाद पेटवला. त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपल्या वक्तव्याचे समर्थन केलेच. तसेच काही मुस्लिम जोडप्यांना जास्त मुले जन्माला घालणे शक्य नसेल तर मुस्लिम दुसरे लग्न करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. त्यासाठी बिहार आणि पश्चिम बंगालमधून मुली विकत घेण्यासारख्या गोष्टीही ते करतात असा आरोपही त्यांनी केला.