भाजप खासदार डॉ. वीरेंद्र कुमार लोकसभेचे हंगामी अध्यक्ष

10

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मध्य प्रदेशमधील टीकमगडचे भाजप खासदार डॉ. वीरेंद्र कुमार यांची 17 व्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या सरकारमध्ये ते अल्पसंख्याक तसेच महिला व बालकल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री होते.

लोकसभा निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या नव्या सरकारचे पहिले अधिवेशन 17 जून ते 27 जुलै या कालावधीत होणार आहे. लोकसभा अध्यक्षांची निवड होईपर्यंत हंगामी अध्यक्षांच्या उपस्थितीत लोकसभा सभागृहाचे कामकाज चालेल. डॉ. वीरेंद्र कुमार हे नव्या खासदारांना सदस्यता आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत. नव्या अध्यक्षाची निवड झाल्यानंतर हंगामी अध्यक्षांचा कार्यभाग संपुष्टात येईल. लोकसभेतील सर्वात वरिष्ठ सदस्याची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाते. भाजप खासदार असणारे डॉ. वीरेंद्र कुमार यांनी सलग सात केळा लोकसभेची निकडणूक जिंकली आहे. सागर जिह्यातील सागर लोकसभा मतदारसंघातून चार केळा, तर तीन वेळा ते टिकमगड मतदारसंघातून लोकसभेत विजयी झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या