धनगर समाजाला आरक्षण देण्यास भाजप खासदाराचाच विरोध

15


सामना ऑनलाईन । मुंबई

धनगरांना आरक्षण देऊ असे आश्वासन  भाजपने सत्तेत येण्यापूर्वी दिले होते. परंतु भाजपचेच खासदर धनगर आरक्षणाला विरोध करताना दिसत आहेत. सह्याद्री अतिथीगृहात पार पाडलेल्या बैठकीत दिंडोरीचे खासदार हरीशचंद्र चव्हाण यांनी विरोध दर्शवला आहे.

चव्हाण म्हणाले की,“धनगर समाजला सध्या व्हीजेएनटी मध्ये तीन व साडेतीन टक्के आरक्षण आहे. शासनाने हवे तर त्यात वाढ करून ते 7 किंवा 8 टक्क्यांपर्यंत न्यावे. परंतु धनगारांना अनुसुचित जमातीमध्ये अंतर्भाव करण्यास आमचा तीव्र विरोध आहे.” धनगर समाज अनूसूचित जमातीत मोडत नाही असेही चव्हाण यांनी सांगितले.

काँग्रेस आमदार के.सी पाडवी यांनीही धनगर आरक्षणाला विरोध केला आहे. आदिवासी सल्लागार परिषदेशी सल्लामसलत न करता धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिफारस करणे हे कायदेशीर आहे का? असा प्रश्न पाडवी यांनी उपस्थित केला. तसेच मंत्रिमंडळाला कुठलाही अहवाल सादर न करता हे पाऊल उचलणे अयोग असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या