सावित्रीबाई फुले मोदी सरकारविरोधात मैदानात

6


सामना ऑनलाईन । लखनौ

मोदी सरकारचे धोरण हे दलितविरोधी आहे असा स्पष्ट आरोप करतानाच भाजपच्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी आपल्या पक्षाच्या सरकारविरोधात मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १ एप्रिलपासून आपले आंदोलन सुरू होईल अशी घोषणा त्यांनी एका पत्रकार परिषदेत केली. त्या उत्तर प्रदेशातील बहराईच जिह्यातील भाजपच्या खासदार आहेत.

१ एप्रिल रोजी लखनौ येथे आपण ‘संविधान बचाव’ रॅली आयोजित केली आहे असे त्यांनी सांगितले. हिंदुस्थानच्या राज्यघटनेमुळेच मी आज खासदार आहे. हे संविधान नसते तर मला ही संधी मिळालीच नसती असे त्या म्हणाल्या.

आपली प्रतिक्रिया द्या