भाजप कार्यकर्त्याला पैसे वाटताना रंगेहाथ पकडले

सामना ऑनलाईन, पाथर्डी

नगर जिल्ह्यातील भालगाव ग्रामपंचायतीसाठी निवडणुका होणार असून इथे मतदारांना पैसे वाटताना भाजप तालुकाध्यक्षासह दोघांना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. माणिकराव खेडेकर असं भाजप तालुकाध्यक्षाचे नाव आहे. खेडेकर आणि त्यांचा सहकारी राजेंद्र सुपेकर मतदारांना पैसे वाटत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीनंतर  पोलिसांनी सापळा रचला.

manikrao-khedekar

पोलीस जेव्हा गावात पोहोचले तेव्हा हे दोघे जण नंबर नसलेल्या दुचाकीवरून गावात फिरत होते आणि पैसे वाटत होते. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं आणि चौकशीला सुरुवात केली. सुरुवातीला दोघांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र पोलिसांनी झडती घ्यायला सुरुवात करताच  खेडकरनं पैसे खाली टाकले. पोलिसांनी हे पैसे जप्त केले असून रकमेची मोजदाद केल्यानंतर ते साडेसात हजार रूपये असल्याचं स्पष्ट झालं.