‘गठ’बंधन ते ‘तूट’बंधन, ‘तुझं-माझं जमेना’ सरकारचे ४० महिने

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मंगळवारी नवी दिल्लीमध्ये भाजप नेत्यांच्या बैठकीमध्ये जम्मू-कश्मीरने सरकारमधून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्याआधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत विशेष चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. भाजपच्या सत्तेमधून बाहेर पडायच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवला आहे. काँग्रेसनेही पीडीपीला पाठिंबा देणार नसल्याचे जाहीर केल्याने जम्मू-कश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होणार असल्याची शक्यता दाट झाली आहे.

राम माधव यांनी भाजप सरकारच्या अपयशांचा पाढा वाचला

जम्मू-कश्मीरमध्ये २०१५ या वर्षी भाजप-पीडीपीचे संयुक्त सरकार अस्तित्वात आले होते. त्यानंतर मुख्यमंत्रीपद पीडीपीकडे तर उपमुख्यमंत्रीपद भाजपकडे राहील असे ठरले. १ मार्च २०१५ ला पीडीपीचे नेते मुफ्ती मोहम्मद सईद यांनी जम्मू-कश्मीरचे १२ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. परंतु वर्षभराचा काळ पूर्ण होण्याआधीच ७ जानेवारी २०१६ ला त्यांचे अचानक निधन झाले.

‘यांना’ भेटल्यानंतरच भाजपने घेतला सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय

मुख्यमंत्र्यांच्या निधानानंतर जम्मू-कश्मीरमध्ये राजकीय संकट गडद झाले. सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू झाली. अखेर भाजपने पुन्हा एकदा पीडीपीसोबत मिळून सरकार स्थापन करण्याचे ठरवले. भाजपचा पाठिंबा मान्य करत पीडीपीने संयुक्त सरकार स्थापन केले. ४ एप्रिल २०१६ ला मेहबुबा मुफ्ती यांनी जम्मू-कश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तर उपमुख्यमंत्रीपदी भाजपचे आमदार निर्मल सिंह विराजमान झाले. परंतु भाजप आणि पीडीपी सत्तेत आल्यापासून अनेक मुद्द्यावरून तू-तू मे-मे चालू झाले होते. सत्तेच्या जवळपास ४० महिन्यांच्या कालावधीमध्ये दोघांमधील विचारांचे मतभेद अधिक तीव्र होत गेल्याने अनेकवेळा दिसून आले.

या मुद्द्यांवर झाले मतभेद
भाजप आणि पीडीपी सरकारमध्ये अनेक मुद्द्यावर मतभेद झाले. जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लष्कराने राबवलेले ऑपरेशन ऑलआऊट, जवानांवर दगडफेक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा मुद्दा तसेच रमजानमध्ये पुकारण्यात आलेल्या एकतर्फी शस्त्रबंदी यासारख्या मुद्द्यावरूनही भाजप-पीडीपीमध्ये मतभेद सुरू होते. अखेर याच मुद्द्याचा हवाला देत भाजपने सरकारमधून बाहेर पडण्याचे जाहीर केले.

कश्मीरचे सत्तासमीकरण –
विधानसभा जागा – ८७
पीडीडी – २८ जागा
भाजप २५ जागा
एनसी – १५ जागा
काँग्रेस – १२ जागा
इतर व अपक्ष – ०७ जागा