इंदिरा गांधींप्रमाणेच होऊ शकते माझी हत्या;अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर आरोप

79

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भाजप पक्ष माझ्या जिवावर उठला आहे असा आरोप आम आदमी पार्टीचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला . पंतप्रधान इंदिरा गांधी यांची वैयक्तिक सुरक्षारक्षकाने हत्या केली होती त्याचप्रमाणे माझी हत्या भाजप करू शकतो, असा आरोप केजरीवाल यांनी केला.

माझ्या वैयक्तिक सुरक्षारक्षकाकरवी भाजप एकेदिवशी माझी हत्या करू शकतो. माझे सुरक्षारक्षक भाजपला रिपोर्ट करतात असे केजरीवाल यांनी सांगितले. भाजप माझ्या जिवावर उठला आहे. एक दिवस  ते माझी हत्या करतील, असे केजरीवाल म्हणाले.  केजरीवाल सध्या पंजाबमध्ये आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी गेले आहेत. पंजाबमधील सर्व जागा आम आदमी पार्टी लढवीत आहे. या महिन्याच्या प्रारंभी एका रोड शोदरम्यान दिल्लीतील मोतीनगर येथे एका व्यक्तीने केजरीवाल यांना थोबाडले होते. दिल्ली पोलिसांनी केजरीवाल यांना मारणारी व्यक्ती ‘आप’चा बंडखोर कार्यकर्ता असल्याचे म्हटले होते, मात्र केजरीवाल यांनी भाजपला हल्ल्याबद्दल जबाबदार धरले होते.

आपली प्रतिक्रिया द्या