केरळ सरकार विरोधात भाजपची ‘सबरीमाला संरक्षण रथयात्रा’

1

सामना ऑनलाईन । बंगळुरू

सबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतरही वादंग सुरुच आहे. आता या वादाला राजकीय रंग येऊ लागला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर महिलांकडूनच निर्णयाला विरोध होत असून राजकीय पक्षांचाही महिलांच्या भुमीकेला पाठींबा मिळत आहे. भाजपच्या वतीने गुरुवारपासून कर्नाटक ते सबरीमाला अशी ‘सबरीमाला संरक्षण रथ यात्रा’ काढली जात आहे. कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष पीएस श्रीधरन पिल्लई यांच्या नेतृत्वात ही रथ यात्रा निघणार आहे. या रथ यात्रेला माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा हिरवा झेंडा दाखवतील.

कर्नाटकातल्या मत्तूरमधून सुरु होणारी ही रथ यात्रा 30 नोव्हेंबरला येथे पोहेचणार आहे.”महिलांचा सन्मान करणे ही आमची संस्कृती आहे. मात्र या परिस्थितिला केरळ सरकार जबाबदार आहे. केरळ सरकारने सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी योग्य पद्धतीने बाजू मांडू शकले नाही” असा आरोप बीएस येडियुरप्पा  यांनी केला आहे.  “आमचा पक्ष न्यायालयाच्या निर्णयाचा विरोध करत नाही, मात्र लोकभावनेता आदर करतो”. केरळ सरकारने न्यायालयात फेरयाचीका दाखल करून हा निर्णय बदलला जावा अशी मागणी येडियुरप्पा यांनी केली आहे. या रथयात्रेत मोठ्या संख्येने साधु-महंत, 62 बिशप, 12 मौलाना सहभागी होणार आहेत.