दलितांनी मागास राहावे हाच भाजपचा दृष्टिकोन!

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

महाराष्ट्रात उसळलेल्या हिंसाचाराला हिंदुत्ववादी भाजपच जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. दलितांनी कायम मागास आणि खालच्या स्तरावरच राहावे हाच भाजपचा दृष्टिकोन असल्याचे ट्विट राहुल यांनी केले. या घटना भाजपच्या जातीयवादाच्या प्रतीक आहेत असे ते म्हणाले. रोहित वेमुला प्रकरण, उनातील हिंसाचार आणि आता भीमा-कोरेगावचा हिंसाचार या घटनांमधून दलितांचा उद्रेकच दिसून येतो असे ते म्हणाले. २०० वर्षांपूर्वीच्या एका युद्धावरून हिंसाचार उफाळणे अयोग्य असल्याचेही ते म्हणाले.