लालूंना विषप्रयोग करून मारण्याचा कट, राबडी देवींचा आरोप

2
rabri-devi-tejashwi-yadav

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लालू प्रसाद यांना विषप्रयोग करून मारण्याचा कट आखला जात आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि लालूंच्या पत्नी राबडी देवी यांनी केला आहे. भाजप सरकार लालूंना मारण्याच्या प्रयत्नात आहे असा गंभीर आरोप राबडी देवी यांनी केला आहे. राबडी देवी यांनी ट्विट करून हा आरोप केला आहे.

ट्विटमध्ये राबडी देवी म्हणतात की, “भाजप सरकार लालूंना विष देऊन इस्पितळात देऊन मारण्याच्या प्रयत्नात आहे. कुटुंबीयांच्या कुठल्याच सदस्याला लालूंची भेट घेऊ देत नाहीत. नियमांना डावलून लालूंवर हुकुमशाही सुरू आहे.” तसेच जर बिहारची जनता रस्त्यावर उतरली तर परिणाम वाईट होतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.