Exit poll उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा बोलबाला, काँग्रेसला फक्त दोन जागा

110

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

उत्तर प्रदेशमध्ये भाजप, काँग्रेस व सपा-बसपा यांच्यातील तिरंगी लढतीत भाजप बाजी मारून जाणार असल्याचे संकेत एक्झिट पोलमधून मिळाले आहेत. एकंदरित बहुतांश एक्झिट पोलमधून भाजप उत्तर प्रदेशमध्ये 40 च्या आकड्याच्या जवळपास जाणार आहे. तसेच सपा व बसपाला देखील युतीचा फायदा होणार असल्याचे अंदाज वर्तविण्यात आले आहेत. गेल्या लोकसभा निवडणूकीत सपाला 4 तर बसपाला एकही जागा मिळाली नव्हती. त्या तुलनेत या निवडणूकीत सपा बसपा एकत्र अंदाजे 20 जागांवर निवडणून येण्याची शक्यता आहे. भाजपने जरी सर्वाधिक जागा मिळविल्या असल्या तरी गेल्या निवडणूकीच्या तुलनेत भाजपच्या आकड्यात मोठी घट झाली आहे.

जन की बात: एनडीए – 46-57, महागठबंधन – 21-32, युपीए- 2-4

टाईम्स नाऊ: एनडीए 58, महागठबंधन 20, युपीए 2

न्यूज 18: एनडीए 60-62, महागठबंधन 17-19, युपीए 1-2

एबीपी : एनडीए 22, महागठबंधन- 56, युपीए – 2

रिपब्लिक : एनडीए 38, महागठबंधन 40, युपीए – 2

आपली प्रतिक्रिया द्या