Exit poll पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना धक्का, भाजपच्या जागा वाढणार

39

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणूकीच्या सातही टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये भाजप व तृणमूल काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाले. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर सडकून टीका केली होती. आता या दोघांमधील वादाचा फायदा भाजपला होताना दिसत आहे. एक्झिट पोलनुसार भाजपच्या पश्चिम बंगालमधील जागा वाढल्या असून तृणमूलला त्याचा जबरदस्त फटका बसण्याची चिन्ह आहेत.

गेल्या लोकसभा निवडणूकीत अवघ्या दोन जागा मिळविणाऱ्या भाजपला यंदा तब्बल 16 ते 26 पर्यंत जागा मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तविण्यात आला आहे.

रिपब्लिक टीव्ही Cvoter :
एनडीए-18-26
तृणमूल काँग्रेस- 13-21
यूपीए-3
अन्य-0

टाइम्स नाऊ- वीएमआर सर्वे
बीजेपी-11
कांग्रेस-2
टीएमसी-28
अन्य-0

एबीपी नेल्सन
बीजेपी- 16
कांग्रेस-2

आपली प्रतिक्रिया द्या