मीरा-भाईंदरमध्ये कमळ फुलले,शिवसेना २२ जागांवर विजयी

सामना ऑनलाईन, भाईंदर

मीरा-भाईंदर महापालिकेवर भाजपचे कमळ फुलले. ९५ पैकी ६१ जागा जिंकून भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले. शिवसेनेनेही २२ जागा जिंकल्या. गेल्या महापालिका निवडणुकीच्या तुलनेत शिवसेनेच्या आठ जागा आणि मताधिक्यही वाढले. या निवडणुकीत राष्ट्रवादी, मनसे आणि बहुजन विकास आघाडीचा सुपडा साफ झाला असून त्यांना भोपळाही फोडता आला नाही.

मीरा-भाईंदर महापालिकेसाठी गेला महिनाभर प्रचाराचा धुरळा उडाला होता. सर्वच पक्षांनी ही निवडणूक स्वबळावर लढवली होती. त्यात शिवसेना आणि भाजप अशी काँटे की टक्कर झाली होती. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. भाजपने ९५ पैकी ६१ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळविली. शिवसेनेनेही २२ जागांवर विजय मिळविला. शिवसेनेच्या आठ जागा वाढल्या. एकेकाळी महापालिकेवर सत्ता गाजविणाऱया राष्ट्रवादीला मात्र भोपळाही फोडता आला नाही. मागील निवडणुकीत १९ जागा जिंकणाऱया काँग्रेसला फक्त १० जागा राखता आल्या तर मनसेला एकुलता एक नगरसेवकही टिकवता आला नाही.

पक्षीय बलाबल  एकूण जागा ९५

  • भाजप-६१
  • शिवसेना-२२
  • काँग्रेस-१०
  • अपक्ष-०२
  • राष्ट्रवादी-००
  • बविआ-००
  • मनसे-००
  • Rajkumar Ghat

    ठाकरे आणि त्याची भामटि सेनेची भामटेगिरी आणि दुसर काय..