आत्महत्या करणारे शेतकरी म्हणजे सवलती चाटणारे व्यापारी,भाजपा आमदाराचं विधान

सामना ऑनलाईन, भोपाळ

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ६५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची स्पष्ट कबुली दिली होती. शेतकऱ्यांच्या नावाने मतांचा जोगवा  मागणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा दाखवणारं आणखी एक उदाहरण मध्य प्रदेशमध्ये बघायला मिळालं आहे. भाजपाचे तिथले आमदार रामेश्वर शर्मा यांनी म्हटलंय की जे लोकं आत्महत्या करतात ते शेतकरी नसून सवलती चाटणारे व्यापारी आहेत. या आमदार महोदयांच्या मते खरा शेतकरी आत्महत्याच करत नाही. तुम्हीही ऐका या असंवेदनशील भाजपा आमदाराचं काय म्हणणं आहे.

रामेश्वर शर्मा यांचे हिंदीमधले विधान आहे तसे

हमने अच्छे अच्छे पैसेवालों को मरते हुए देखा है

ओरिजनल किसान लडते देखा है…. मरते नही देखा

मरे वो किसान है जो किसान कम…..और सबसिडी ज्यादा चाटने का व्यापार करते है

मरे वो लोग है जिन्होने किसानी को बदनाम किया है

सर…..मेरी खेती एक एकर मे ५० क्विंटल गेंहू उगा लूX…तू तो क्या भगवान भी चाहे तो उगा नही सकता

हम लोग किसान है,नही उगा सकते है

लेकीन तुमने अॅग्रिकल्चर को भी बदनाम कर दिया है.

कुछ मोटे अधिकारियों ने और कुछ बैठे हुए अधिकारियोंने