अफगानिस्तानमध्ये स्टेडियमबाहेर आत्मघातकी हल्ला, ६ ठार

सामना ऑनलाईन । काबूल

अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये टी-२० स्थानिक क्रिकेट सामने सुरु असताना दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात ६ जण ठार झाले असून ४० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. ठार झालेल्यांमध्ये दोन सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे. तिसऱ्या व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसून तो हल्लेखोर असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान अद्यापपर्यत या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्विकारलेली नाही. हल्ल्यानंतर स्टेडियममधून खेळाडू व नागरिकांना तात्काळ बाहेर काढण्यात आले आहे.