काँग्रेस आमदाराच्या घराबाहेर स्फोट, एकाचा मृत्यू

5

सामना ऑनलाईन । बंगळुरू

बंगळुरूमध्ये काँग्रेस आमदार मुनिराथाना यांच्या घराबाहेर स्फोट झाला असून त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. सकाळी साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. यावेळी आमदार मुनिराथाना हे त्यांच्या घरातच होते.

रविवारी सकाळी हा स्फोट झाला असून प्रथमदर्शी हा भुसुरूंग स्फोट असल्याचे बोलले जात आहे. अद्याप याबाबत काही अधिकृत माहिती मिळालेली नाही. या स्फोटात मुनिराथाना यांच्या घराबाहेरून जाणाऱ्या वेकेंटेश नावाच्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तसेच मुनिराथाना यांच्या घराचेही नुकसान झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या