ब्रिटनमधील टाटा स्टील कंपनीत तीन मोठे स्फोट

80
फोटो प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । वेल्स

ब्रिटनमध्ये असलेल्या वेल्स येथील टाटा स्टील कंपनीत शुक्रवारी सकाळी तीन मोठे स्फोट झाले आहेत. या स्फोटांमुळे पूर्ण वेल्स शहर हादरलं आहे. पहाटे तीन वाजता झालेल्या या स्फोटांमध्ये जीवितहानी झाल्याचं वृत्त नसून आग आटोक्यात आणली गेली आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, टाटा स्टील कंपनीत शुक्रवारी पहाटे साडे तीन वाजता हे तीन स्फोट झाले. एका पाठोपाठ एक अशा तीन स्फोटांनी स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली. टाटा स्टील कंपनीतून आगीचे लोळ उठत होते. त्यानंतर स्थानिक सुरक्षा यंत्रणांना तत्काळ धाव घेत आग आटोक्यात आणली. या घटनेत दोन जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फॅक्टरीच्या आत मोल्टन मेटल घेऊन जाणाऱ्या एका ट्रेनमध्ये हे स्फोट झाले. कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या