राम कदमांचं चाललंय काय? सोनाली बेंद्रेला जिवंतपणी वाहिली श्रद्धांजली

ram-kadam-bjp

सामना ऑनलाईन । मुंबई

घाटकोपरच्या दहीहंडी कार्यक्रमात मुली पळवण्याचे बेताल विधान करणाऱ्या भाजप आमदार राम कदम पुन्हा एकदा गोत्यात आले आहेत. शुक्रवारी राम कदम यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे त्यांना नेटकरी ट्रोल करत आहेत. राम कदम यांनी कॅन्सरशी लढा देणारी अभिनेत्री सोनाली बेंद्र हिला जिवंतपणी श्रद्धांजली वाहिली आणि नेटकऱ्याच्या निशाण्यावर आले.

ram-kadam-on-sonali

काही काळानंतर राम कदम यांना आपली चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी जुने ट्वीट डिलीट केले आणि ही एक अफवा असल्याचे म्हणत तिच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. परंतु तोपर्यंत त्याचे स्क्रीनशॉट सर्वत्र व्हायरल झाले होते. यानंतर नेटकऱ्यांनी राम कदम यांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

सोनाली बेंद्रे हिच्यावर अमेरिकेत उपचार सुरू असून तिने 22 तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. यात तिच्या डोक्यावरचे केस पूर्णपणे निघाल्याचे दिसत आहे.