पालिकेच्या वैधानिक, प्रभाग समित्यांच्या निवडणुका एप्रिलमध्येच होणार

सामना प्रतिनिधी, मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या आचारसंहितेचा मुंबई महापालिकेच्या वैधानिक आणि विशेष समित्यांच्या निवडणुकांना फटका बसणार नसून या सर्व समित्यांच्या निवडणुका एप्रिलमध्येच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पालिकेचा कारभार सभागृह, वैधानिक व विशेष समित्यांच्या माध्यमातून तर स्थानिक पातळीवर कारभार प्रभाग समित्यांच्या माध्यमातून चालवण्यात येतो. पालिकेची 24 प्रभाग कार्यालये असून 17 प्रभाग समित्यांच्या माध्यमातून या कार्यालयांचा कारभार चालवला जातो. या प्रभाग समित्यांवर ज्या राजकीय पक्षाचे नगरसेवक जास्त त्या पक्षाचा अध्यक्ष निवडला जातो. सध्या सर्व वैधानिक समित्यांवर शिवसेनेचा अध्यक्ष आहे तर 17 पैकी 8 प्रभाग समित्या शिवसेनेकडे, 8 प्रभाग समित्या भाजप व अखिल भारतीय सेनेकडे एक समिती आहे.