व्हिडिओ- बॅकफ्लिप मारताना बॉडी बिल्डरचा मृत्यू

सामना ऑनलाईन । डरबन

अतिउत्साह कधी कधी धोकादायक ठरू शकतो. असाच अतिउत्साह दक्षिण आफ्रिकेच्या बॉडी बिल्डरच्या जीवावर बेतला आहे. माजी आएफबीबी जुनियर चॅम्पियन सिफिसो लंगेलो थाबेटचा बॅकफ्लिप मारताना मृत्यू झाला आहे. तो अवघ्या २३ वर्षांचा होता.

प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादाला भारावून मॅटच्या मध्यभागी येऊन सिफिसो थाबेटने बॅकफ्लिप मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तोल गेल्याने तो डोक्यावर पडला. या घटनेत मानेचं हाड मोडल्याने तो जमिनीवर निपचित पडून राहिला, त्यानंतर त्याचा मृत्यू सोडले.